आजची वात्रटिका
---------------------
मनसेचे नवनिर्माण
लाव रे तो व्हिडिओ,
हा नारा आत्ता नाही.
महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटचा,
अजूनही पत्ता नाही.
बदलला झेंडा,
बदललेले व्हिजन आहे.
हवामानाचा अंदाज घेत,
त्यांचा नवा सिझन आहे.
जुन्याच दशावताराचे,
आता नवीन सोंगे आहेत!
हनुमान चालीसा वाजवणारे,
जिकडे तिकडे भोंगे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7891
दैनिक झुंजार नेता
5एप्रिल2022
No comments:
Post a Comment