Sunday, April 17, 2022

धार्मिक विचार....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

धार्मिक विचार

धर्म जसा अफूची गोळी आहे,
तसा धर्म जिवंत दारुगोळा आहे.
धार्मिक कट्टरता वाद म्हणजे,
चक्क वेडेपणाचा चाळा आहे.

धार्मिक असायला हरकत नाही,
पण चुकूनही धर्मवेडे होवू नका.
धार्मिकतेचा अतिरेक करीत,
कुणी वेड्याचे सोंग घेऊ नका.

धर्मासाठी माणूस नसतो,
माणसासाठी धर्म असला पाहिजे!
माणुसकीच्या नात्यावरती,
प्रत्येक धर्म पोसला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6450
दैनिक पुण्यनगरी
17एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा

 दैनिक वात्रटिका 29एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -327 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Qdm8vBAFqaFmdkkt4Q3...