Tuesday, April 19, 2022

पॉलिटिकल हॅकिंग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

पॉलिटिकल हॅकिंग

त्यांचे त्यांना काहीच वाटत नाही,
आपल्याला सगळे शॉकिंग आहे.
एकमेकांच्या राजकीय मुद्द्यांचे,
अगदी उघड उघड हॅकिंग आहे.

जसे हॅकिंग आहे,शॉकिंग आहे,
तसे परस्परांचे चेकिंग आहे.
बातमी जुनी असल्या तरी,
आपल्यासाठी ते ब्रेकिंग आहे.

ब्रेकिंग असो वा रॉकिंग असो,
ही पॉलिटिकल बुकिंग आहे!
गुद्द्यावरून मुद्द्यावर आले तरी,
प्रत्यक्षात मात्र फेकाफेकींग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6452
दैनिक पुण्यनगरी
19एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...