Tuesday, April 12, 2022

भोंगे पुराण....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

भोंगे पुराण

कुणाचा कशासाठी भोंगा आहे?
कुणाचा कशासाठी भोंगा आहे?
कितीही भोंगे वाजवून झाले,
तरी जनतेच्या हाती ठेंगा आहे.

सुलटे तोंड उलटे करीत,
रेल्वे इंजिनचाही भोंगा आहे.
नाहीतरी कपड्याच्या आत,
इथे प्रत्येकजण नंगा आहे.

भोंगेसे नहीं,नंगेसे खुदा डरे,
म्हणूनच गोष्टी बिकट आहेत!
हनुमानजीकी कृपा से,
आता भोंगेही फुकट आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7897
दैनिक झुंजार नेता
12एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...