आजची वात्रटिका
---------------------
वाढदिवसाचा पराक्रम
वाढदिवसाचा आनंद,
उन्मत्तपणे लुटू लागले.
वाढदिवसाला केकचे मुंडके.
तलवारीने छाटू लागले.
कुणी दाखवतो तलवारी,
कुणी गोळ्या झाडतो आहे
एकाचे बघून दुसऱ्याचा,
माजोरपणा वाढतो आहे.
कसले शौर्य?कसले काय?
हा तर पोरखेळ आहे !
आईबापांच्या पराक्रमाचे,
वाढदिवस हे फळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6465
दैनिक पुण्यनगरी
12एप्रिल2022
No comments:
Post a Comment