आजची वात्रटिका
---------------------
पॉलीट्रिक्स
जातीला जातीवर घातले जाते,
धर्माला धर्मावर घातले जाते.
कितीही महाग झाले तरी,
आग लावून तेल ओतले जाते.
सामाजिक तेढ वाढवून,
सलोख्याला दुरापास्त केले जाते!
लोकांचे जगणे महाग करून,
लोकांचे मरण स्वस्त केले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6457
दैनिक पुण्यनगरी
4एप्रिल2022
No comments:
Post a Comment