Tuesday, April 5, 2022

पंपावरची डायलॉगबाजी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

पंपावरची डायलॉगबाजी

पेट्रोल म्हणाले पंपाला,
मै झुकेगा नही साला.
डिझेलनेही ओढली री,
मै भी रुकेगा नही साला.

टाकी फुल्ल होताच,
गाडीच्या गाली खळी आहे.
गाड्यांच्या मालकांवर,
आता रडायची पाळी आहे.

टू व्हीलर च्या साक्षीला
फोर व्हीलर आहेत !
पंपा पंपावरचे डायलॉग,
हे तर केवळ ट्रेलर आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6458
दैनिक पुण्यनगरी
5एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...