आजची वात्रटिका
---------------------
हा खेळ भावनांचा...
पृथ्वी गोल आहे म्हटले तरी,
इथे इथे भावना दुखावल्या होत्या.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटले तरी,
कुठे भावना सुखावल्या होत्या?
भावना सुखावणे आणि दुखावणे,
दोन्हींचेही एकच लॉजिक आहे !
भावना खोट्याने सुखावतात,
भावना खऱ्याने दुखावयात,
ही हातचलाखीची मॅजिक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7907
दैनिक झुंजार नेता
22एप्रिल2022
No comments:
Post a Comment