आजची वात्रटिका
---------------------
राजकीय उट्टं
कुणी तळ्यात आहे,
कुणी मळ्यात आहे,
आरोपांच्या फैरीने,
संशयाच्या जाळ्यात आहे.
संशयाचे जाळे असे,
सर्वत्र पसरू लागले.
विश्वास नावाची गोष्ट,
सगळेच विसरू लागले.
संशयाचे जाळे कसे,
अगदीच घट्ट आहे !
जो तो काढतोय,
ते राजकीय उट्टं आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7893
दैनिक झुंजार नेता
7एप्रिल2022
No comments:
Post a Comment