आजची वात्रटिका
---------------------
घरगुती देशद्रोह
अजे झाले, मग दुजे झाले,
त्यापाठोपाठ चक्क तिजे झाले.
पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाचे,
बायकोने चक्क भजे केले.
बायकोने आपला प्रताप,
असा पुन्हा पुन्हा दाखल केला.
बायकोवर चिडून नवऱ्याने,
देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
खाद्य संस्कृतीचा अपमान,
असा नवऱ्याने डाव साधला आहे.
बायकोनेही मग तेच केले,
ती विसरली आपला दादला आहे.
आज नवरा आणि बायकोही,
तुरुंगात खडी फोडीत आहेत !
हनुमान चालीसा म्हणत म्हणत,
गोडीत दिवस काढीत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6459
दैनिक पुण्यनगरी
26एप्रिल2022
No comments:
Post a Comment