आजची वात्रटिका
---------------------
सोमय्यांचा 'रेड' अलर्ट
सोमय्या बोले;ईडी चाले,
अशीच नवी म्हण आहे.
भ्रष्टाचाऱ्याला आत घालू,
असाच त्यांचा पण आहे.
सोमय्यांच्या अलर्ट नंतर,
नेमकी ईडीची रेड आहे !
ईडीच्या धाडसत्राला,
राजकारणाची शेड आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6459
दैनिक पुण्यनगरी
6एप्रिल2022
No comments:
Post a Comment