Saturday, April 2, 2022

मै झुकेगा नही साला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

मै झुकेगा नही साला

याचा त्याचा गोंडा घोळ,
स्वाभिमान नाही ज्याला,
आज काल तो सुद्धा म्हणतो,
मै झुकेगा नही साला.

खाली मुंडी,पाताळ धुंडी,
भ्रष्टाचाराच्या गटारात न्हाला.
आज तोही डायलॉग मारतो,
मै झुकेगा नही साला.

अन्याय अत्याचार सोसले,
त्याची जाणीवही नाही त्याला.
वाकडं तोंड करीत म्हणतोय,
मै झुकेगा नही साला.

मानी हा,स्वाभिमानी व्हा,
शोषकांच्या बुडावर लाथ घाला!
मग मोठ्या दिमाखात म्हणा,
मै झुकेगा नही साला !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6455
दैनिक पुण्यनगरी
2 एप्रिल2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...