Thursday, April 21, 2022

निष्ठेचा पिंड... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
निष्ठेचा पिंड
कार्यकर्त्यांची निष्ठा बघा,
कट्टर आणि अथक असते.
नेत्याला सुतक पडले की,
कार्यकर्त्यालाही सुतक असते.
कार्यकर्त्यांची कट्टरता बघून,
आपणही हादरून जातो.
नेत्यांसाठी कार्यकर्ता जेंव्हा,
स्वतःलाही भादरून घेतो.
कार्यकर्त्यांच्या कट्टर निष्ठेला,
आम्ही मुळीच नावं ठेवत नाही !
कार्यकर्त्यांच्या पिंडाला मात्र,
कधीच कावळा शिवत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6454
दैनिक पुण्यनगरी
21एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...