आजची वात्रटिका
----------------------------
मास्क मुक्ती
कोरोनाचे निर्बंध हटले,
महाराष्ट्रात मास्क मुक्ती आहे.
मास्कला बाय-बाय करतानाच,
हेल्मेटची मात्र सक्ती आहे.
मास्क गेला,हेल्मेट आले,
तेही आता सक्तीचे झाले आहे!
कोरोनापासून सुटका झाली तरी,
सर्दी जाऊन,पडसे आले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6454
दैनिक पुण्यनगरी
1 एप्रिल2022
No comments:
Post a Comment