Wednesday, April 13, 2022

उत्तर सभा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

उत्तर सभा

आधी झाली ती प्रश्नसभा,
नंतरची उत्तर सभा होती.
स्वतः निर्माण केलेल्या प्रश्ननांना,
उत्तराची मुभा होती.

उत्तर सभेच्या टिझरचा,
सूचक असा बझर आहे !
पूर्वसभेच्या मुद्द्यांचाच,
उत्तर सभेत गजर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6465
दैनिक पुण्यनगरी
12एप्रिल2022

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...