आजची वात्रटिका
---------------------
परिस्थितीजन्य पुरावा
गोंधळात गोंधळ उडाल्याचे,
पुरावे तर साक्षात आहेत.
कुणाच्याच येत लक्षात नाही,
कोण?कोणत्या?पक्षात आहेत?
ही काही गंमत जंमत,
हा पुरावा परिस्थितीजन्य आहे!
त्यांचा त्यांचाच गोंधळ उडतो,
त्यांची खरोखरच धन्य आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7895
दैनिक झुंजार नेता
10एप्रिल2022
No comments:
Post a Comment