Friday, April 8, 2022

ये वादा न तोड.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

ये वादा न तोड..

आपल्याला ते सुखी वाटले तरी,
सांगा ते कुठे सुखी आहेत?
आता फक्त मागच्या जन्मातले,
घोटाळे काढायचे बाकी आहेत.

कुणी घोटाळ्यांचा मास्टर आहे,
कुणी घोटाळ्यांचा दादा आहे!!
घोटाळे आणि नेत्यांचा,
जनम जनम का वादा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7894
दैनिक झुंजार नेता
8एप्रिल2022

 

1 comment:

SHAPU said...

खरंय ...भीषण आहे हे सर्व

daily vatratika...29jane2026