आजची वात्रटिका
---------------------
राष्ट्रीय नेते
गल्ली ताब्यात आली की,
दिल्ली ताब्यात आल्यासारखे वाटते.
राष्ट्रीय प्रश्नावर बोलले की,
राष्ट्रीय नेता झाल्यासारखे वाटते.
ज्यांचे ज्यांचे गल्लीतही,
अनेकदा गोत्यावरती गोते आहेत !
न्यूज चॅनलनलच्या सौजन्याने,
तेच आज राष्ट्रीय नेते आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7903
दैनिक झुंजार नेता
18एप्रिल2022
No comments:
Post a Comment