Sunday, April 3, 2022

टायगर अभी जिंदा है....मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
---------------------

टायगर अभी जिंदा है

सगळे कार्यकर्ते म्हणू लागले,
आमचाच नेता खंदा आहे.
सगळे डायलॉग मारू लागले,
टायगर अभी जिंदा आहे.

एक था टायगर,
इथेच तर खरा वांधा आहे.
एकाचे ऐकूण दुसरे म्हणतात,
टायगर अभी जिंदा आहे.

कुणी बंदा आहे;खंदा आहे,
सगळा थापालॉजीचा धंदा आहे !
ते म्हणाले की आम्हीही म्हणतो,
टायगर अभी जिंदा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6456
दैनिक पुण्यनगरी
3 एप्रिल2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...