आजची वात्रटिका
---------------------
उदात्तीकरण
जे जे विकृत आहे,
ते ते स्वीकृत होते.
अनधिृत गोष्टही,
मग अधिकृत होते.
विकृत स्वीकृत झाले,
सगळा बट्ट्याबोळ होतो.
गोंधळात गोंधळ होवून,
घोळात घोळ होतो.
सामाजिक विकृतीचेही
उदात्तीकरण होत जाते!
भल्या भल्यांची अक्कल,
मग पेंड खात जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7901
दैनिक झुंजार नेता
15एप्रिल2022
No comments:
Post a Comment