Showing posts with label उदात्तीकरण....मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label उदात्तीकरण....मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, April 15, 2022

उदात्तीकरण....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
उदात्तीकरण
जे जे विकृत आहे,
ते ते स्वीकृत होते.
अनधिृत गोष्टही,
मग अधिकृत होते.
विकृत स्वीकृत झाले,
सगळा बट्ट्याबोळ होतो.
गोंधळात गोंधळ होवून,
घोळात घोळ होतो.
सामाजिक विकृतीचेही
उदात्तीकरण होत जाते!
भल्या भल्यांची अक्कल,
मग पेंड खात जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7901
दैनिक झुंजार नेता
15एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...