आजची वात्रटिका
---------------------
झुंडशाही
कुणी या बाजूचे झाले,
कुणी त्या बाजूचे झाले.
मदमस्त बोलणे मग,
मोह आणि काजूचे झाले.
कुणाला जातीची नशा आहे,
कुणाला धर्माची नशा आहे !
सत्य तपासतो कोण?
फक्त झुंडशाहीची भाषा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7909
दैनिक झुंजार नेता
23एप्रिल2022
No comments:
Post a Comment