Friday, April 15, 2022

ऐतिहासिक चिवडाचिवड...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

ऐतिहासिक चिवडाचिवड

शिळ्याच कढीला,
पुन्हा नव्याने उत आहे.
पुन्हा उकरून काढलेले,
जेम्स लेनचे भूत आहे.

आपणच खरे असल्याची,
ज्याला त्याला खात्री आहे.
पुराव्याची साक्ष म्हणून,
ऐतिहासिक पत्रापत्री आहे.

भविष्याच्या चिंतेपोटी,
इतिहासाची आवड आहे!!
लेनने खाल्लेल्या शेणाची,
पुन्हा चिवडाचिवड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6468
दैनिक पुण्यनगरी
15एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...