आजची वात्रटिका
---------------------
विक्रांत
कुणाला भूतकाळाची भ्रांत,
कुणाला वर्तमानाची भ्रांत आहे.
कुणी भविष्याच्या काळजीने,
नको तेवढा चिंताक्रांत आहे.
कुणाची चालली तगमग,
कुणी वरवर तरी शांत आहे!
कोण किती पाण्यात आहे?
त्यासाठीच आता विक्रांत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6463
दैनिक पुण्यनगरी
10एप्रिल2022
No comments:
Post a Comment