आजची वात्रटिका
---------------------
वस्त्रहरण
नेत्यांची अंगवस्त्रे,
त्यांच्यावर घसरू लागली.
कालची प्रेम कहानी,
कानोकानी पसरू लागली.
कालच्या गोड आठवणींचा,
आज कडवट डोस आहे.
अंगवस्त्र आवरता आवरता,
त्यांच्या तोंडाला फेस आहे
आज जरी त्यांचे तोंड,
वेगवेगळ्या दिशानी आहे!
नेत्यांच्या अंगवस्त्रांकडे मात्र,
जुन्या प्रेमाची निशाणी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6453
दैनिक पुण्यनगरी
20एप्रिल2022
No comments:
Post a Comment