Showing posts with label वस्त्रहरण.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वस्त्रहरण.... मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, April 20, 2022

वस्त्रहरण.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

वस्त्रहरण

नेत्यांची अंगवस्त्रे,
त्यांच्यावर घसरू लागली.
कालची प्रेम कहानी,
कानोकानी पसरू लागली.

कालच्या गोड आठवणींचा,
आज कडवट डोस आहे.
अंगवस्त्र आवरता आवरता,
त्यांच्या तोंडाला फेस आहे

आज जरी त्यांचे तोंड,
वेगवेगळ्या दिशानी आहे!
नेत्यांच्या अंगवस्त्रांकडे मात्र,
जुन्या प्रेमाची निशाणी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6453
दैनिक पुण्यनगरी
20एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...