आजची वात्रटिका
---------------------
सब गोलमाल है
बदललेले झेंडे आहेत,
बदललेले दांडे आहेत.
तेच तेच चेहरे असून,
तेच तेच तोंडे आहेत.
कालचा तो मुर्दाबाद,
आजचा तो जिंदाबाद आहे.
त्यांची त्यांनाच तर,
मनमोकळी दाद आहे.
सगळे काही समान आहे,
विकलेले इमान आहे !
सारे कळून सवरूनही,
जनता गप्प गुमान आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7896
दैनिक झुंजार नेता
11एप्रिल2022
No comments:
Post a Comment