Showing posts with label सब गोलमाल है....मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label सब गोलमाल है....मराठी वात्रटिका. Show all posts

Monday, April 11, 2022

सब गोलमाल है....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सब गोलमाल है

बदललेले झेंडे आहेत,
बदललेले दांडे आहेत.
तेच तेच चेहरे असून,
तेच तेच तोंडे आहेत.

कालचा तो मुर्दाबाद,
आजचा तो जिंदाबाद आहे.
त्यांची त्यांनाच तर,
मनमोकळी दाद आहे.

सगळे काही समान आहे,
विकलेले इमान आहे !
सारे कळून सवरूनही,
जनता गप्प गुमान आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7896
दैनिक झुंजार नेता
11एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...