Monday, April 18, 2022

हनुमानाचे अनुमान... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

हनुमानाचे अनुमान

मराठी माणसाचा
बदललेला स्टॅन्ड आहे.
श्री प्रभु रामचंद्रांसारखा,
मीही पॉलिटिकल ब्रँड आहे.

धन्य ते नवनिर्माणकर्ते,
ज्यांना आयडीया सुचली गेली.
प्रथमच हनुमान चालीसा,
मोठ्या प्रमाणात वाचली गेली.

काल जय श्रीराम होते,
आज जय हनुमान आहे!
जान की बाजी लागेल,
हेच माझे अनुमान आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6451
दैनिक पुण्यनगरी
18एप्रिल2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...