आजची वात्रटिका
---------------------
उत्पन्नाचे मार्ग
ईडीची धाडसत्र मालिकेत,
सस्पेन्स आणि ड्रामा आहे.
ज्याच्यावरती पडते धाड,
त्याचा जाहिर मामा आहे.
संशयाचे किडे जरी,
डोक्यामध्ये वळवळू लागले!
ईडीमुळे का होईना,
उत्पन्नाचे मार्ग कळू लागले!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7892
दैनिक झुंजार नेता
6एप्रिल2022
No comments:
Post a Comment