Sunday, April 17, 2022

राख रांगोळी..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

राख रांगोळी

नको त्या गोष्टी,
नको तसे पटवल्या जातात.
मनामध्ये आग लावून,
माणसं पेटवल्या जातात.

माणसं माणसाला पेटवतात,
माणुसकी खाक असते !
सगळे झाल्यावर कळते,
हातामध्ये फक्त राख असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7902
दैनिक झुंजार नेता
17एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...