Thursday, April 21, 2022

भोंगेबाजी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

भोंगेबाजी

सगळे मुद्दे एकाएकी,
अचानक लहान झाले.
सगळीकडचेच भोंगे,
अचानक महान झाले.

जिंदाबाद,मुर्दाबाद,
घोषणांचे भोंगे आहेत!
कळतय पण वळत नाही,
सगळ्यांची सोंगे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7906
दैनिक झुंजार नेता
21एप्रिल2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...