Thursday, April 14, 2022

राजकीय कसरत.....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

राजकीय कसरत

राजकारण लाचार व्हायला लावते,
राजकारण यू-टर्न घ्यायला लावते.
कल्पनाही नसेल त्याची आहुती,
राजकारण सहज द्यायला लावते.

प्रत्येकाची राजकीय मजबुरी,
ही बदलती भूमिका मानली जाते!
ज्याचे त्याला माहित असते,
पेलता पेलता किती ताणली जाते?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7900
दैनिक झुंजार नेता
14एप्रिल2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...