आजची वात्रटिका
---------------------
हृदयसम्रट
प्रत्येक धर्म धर्माचे,
हृदयसम्राट उगवू लागले.
धर्मांधांची जुनीच भूक,
नव्याने भागवू लागले.
धर्म कोणताही असो,
एकसारखीच भूक असते.
त्याची खातरजमा नसते,
काय बरोबर? काय चूक असते?
जो चुकांनाही बरोबर म्हणतो,
काय त्याचे थाट असतात?
तेच असतात धर्मगुरू,
तेच हृदय सम्राट असतात !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7904
दैनिक झुंजार नेता
19एप्रिल2022
No comments:
Post a Comment