आजची वात्रटिका
---------------------
कारण मिमांसा
समाजकारण आणि राजकारण,
खरोखरच खूप वेगळे असते.
समाजकारणात असते समाजसेवा,
राजकारणात मत हेच सगळे असते.
समाजकारणात जनहिताचे,
राजकारणात स्वहिताचे वेध असतात.
समाजकारण आणि राजकारण
यांच्या मतातही मतभेद असतात !
समाजकारणातले लोक,
माजी नाही,नेहमीच आजी वाटतात!
हिमालयएवढ्या उंचीची माणसेही,
राजकारणामुळे खुजी वाटतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6456
दैनिक पुण्यनगरी
23एप्रिल2022
No comments:
Post a Comment