Showing posts with label सोमय्यांचा 'रेड' अलर्ट... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label सोमय्यांचा 'रेड' अलर्ट... मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, April 6, 2022

सोमय्यांचा 'रेड' अलर्ट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सोमय्यांचा 'रेड' अलर्ट

सोमय्या बोले;ईडी चाले,
अशीच नवी म्हण आहे.
भ्रष्टाचाऱ्याला आत घालू,
असाच त्यांचा पण आहे.

सोमय्यांच्या अलर्ट नंतर,
नेमकी ईडीची रेड आहे !
ईडीच्या धाडसत्राला,
राजकारणाची शेड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6459
दैनिक पुण्यनगरी
6एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...