Showing posts with label राजकीय उट्टं... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label राजकीय उट्टं... मराठी वात्रटिका. Show all posts

Thursday, April 7, 2022

राजकीय उट्टं... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

राजकीय उट्टं

कुणी तळ्यात आहे,
कुणी मळ्यात आहे,
आरोपांच्या फैरीने,
संशयाच्या जाळ्यात आहे.

संशयाचे जाळे असे,
सर्वत्र पसरू लागले.
विश्वास नावाची गोष्ट,
सगळेच विसरू लागले.

संशयाचे जाळे कसे,
अगदीच घट्ट आहे !
जो तो काढतोय,
ते राजकीय उट्टं आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7893
दैनिक झुंजार नेता
7एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...