Showing posts with label वाढदिवसाचा पराक्रम....मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वाढदिवसाचा पराक्रम....मराठी वात्रटिका. Show all posts

Tuesday, April 12, 2022

वाढदिवसाचा पराक्रम....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

वाढदिवसाचा पराक्रम

वाढदिवसाचा आनंद,
उन्मत्तपणे लुटू लागले.
वाढदिवसाला केकचे मुंडके.
तलवारीने छाटू लागले.

कुणी दाखवतो तलवारी,
कुणी गोळ्या झाडतो आहे
एकाचे बघून दुसऱ्याचा,
माजोरपणा वाढतो आहे.

कसले शौर्य?कसले काय?
हा तर पोरखेळ आहे !
आईबापांच्या पराक्रमाचे,
वाढदिवस हे फळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6465
दैनिक पुण्यनगरी
12एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...