आजची वात्रटिका
----------------------------
देखला दिवा
लोकप्रतिनिधींनी जनसेवा करावी,
गोष्टी सरळ आणि साध्या आहेत.
तरी कामदार आणि दमदार,
लोकप्रतिनिधींना उपाध्याआहेत.
कुणी खरोखरच हिरो आहेत,
कुणी मात्र पक्के झिरो आहेत.
कुणाचे फक्त ढोल ताशे,
कुणी फिडेलवाले नीरो आहेत.
बिरुदं लावा,उपाध्या लावा,
केवळ दबंगगिरीचा दावा नको !
आपलीच लाल करून घेत घेत,
तुमचा फक्त देखला दिवा नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6453
दैनिक पुण्यनगरी
31मार्च 2022
No comments:
Post a Comment