Wednesday, March 2, 2022

समर्थक जिंदाबाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

समर्थक जिंदाबाद

कुणी अमक्याचा समर्थक आहे,
कुणी तमक्याचा समर्थक आहे.
समर्थनाची मिरवा-मिरवी,
तशी एकदमच निरर्थक आहे.

समर्थकही साधीसुधे नाहीत,
कट्टर आणि कडवे असतात !
एकमेकांच्या प्रगतीला,
मांजरासारखे आडवे असतात

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7858
दैनिक झुंजार नेता
2मार्च 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 19 मार्च 2026 l वर्ष- पाचवे l अंक -219 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...