Tuesday, March 29, 2022

अजब तुझे सरकार.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अजब तुझे सरकार

कुणी उपाशी आहे,
कुणी तुपाशी आहे.
दाण्यांचे वैर आता,
पाखडणाऱ्या सुपाशी आहे.

काही सुपात आहेत,
काही जात्यात आहेत.
तीन तिघाडे,काम बिघाडे,
म्हणूनच गोत्यात आहेत.

धाकटे झाले थोरले,
थोरले आता धाकटे आहेत!
सत्ताधारी असूनही,
दिवस वाईट वकटे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7885
दैनिक झुंजार नेता
29मार्च 2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...