आजची वात्रटिका
------------------------
राजकीय सूडनाट्य
आजचे राजकारण,
ना धडाचे,ना गोडाचे आहे.
जिकडे बघावे तिकडे,
राजकारण सूडाचे आहे.
प्रत्येकालाच वाटते,
मी म्हणजे रॉबिनहूड आहे.
सुडाचे राजकारण म्हणजे,
जनतेवर उगवलेला सूड आहे.
राजकारण्यांना काय वाटते?
याची मुळीच खंत नाही !
सूडनाट्यच्या राजकारणाला,
अजून तरी अंत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6436
दैनिक पुण्यनगरी
13मार्च 2022
No comments:
Post a Comment