आजची वात्रटिका
------------------------
बाई गं. ..
कालचे शिकारी उघड होते,
आजचे शिकारी फसवे आहेत.
सहज करतात बाजारात उभे,
एवढे ते बाजारबसवे आहेत.
कालचे जे ते सनातनी होते,
आजचे तर पुरोगामी आहेत.
कालचे तर बदनाम होते,
आजचे मात्र नामी आहेत.
बदललेत शत्रू बाई,
शोषणाचे नवे मार्ग आहेत!
नरकाच्या मार्गाने नेणारे,
त्यांचे मायावी स्वर्ग आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6431
दैनिक पुण्यनगरी
8मार्च 2022
No comments:
Post a Comment