आजची वात्रटिका
----------------------------
लिटमस टेस्ट
हेही जसे लोफर आहेत,
तेही तसे लोफर आहेत.
अविश्वसनीय वाटणाऱ्या,
परस्परांना ऑफर आहेत.
मतभेद टाळा,
खुशाल राजकारण खेळा,
हे मात्र एकदम बेस्ट आहे.
सामान्य जनतेचीच,
जणू ही लिटमस टेस्ट आहे .
विश्वास नावाची गोष्ट,
कधीच पायदळी तुडवली आहे!
जनतेची पहाटेची झोप,
कायमचीच उडवली आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6441
दैनिक पुण्यनगरी
20मार्च 2022
No comments:
Post a Comment