आजची वात्रटिका
----------------------------
चडफड ते तडफड
सत्तेसाठी वाट्टेल ते म्हणीत,
राजकीय बलिदान द्यावे लागते.
ज्यांचा आयुष्यभर दुस्वास केला,
त्यांनासुद्धा समजून घ्यावे लागते.
चडफड होते,तडफड होते,
सगळे गोड मानून घ्यावे लागते!
कितीही उपेक्षा झाली तरी,
अपेक्षाभंगाला कोळून प्यावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7882
दैनिक झुंजार नेता
25मार्च 2022

No comments:
Post a Comment