आजची वात्रटिका
------------------------
'दूध'खुळेपणा
फक्त आपल्याच देशात,
हा पराक्र‘ होवू शकतो.
जिथे गणपती दुध प्याला,
तिथेच नंदीही दुध पिऊ शकतो.
ज्यांचे दूध उतू चाललेय,
त्यांनी पाजायला बंदी नाही !
बैलांनो संधी चालून आलीय,
आता तरी माना हलवून सांगा
आम्ही काही नंदी नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
6मार्च 2022
No comments:
Post a Comment