आजची वात्रटिका
------------------------
नसत्या उचापती
कुणी बोलतो काही बाही,
कुणी काहीही पचकला जातो.
पडदा पडला वाद मग,
पुन्हा नव्याने उचकला जातो.
पुन्हा होते नवी वादावादी,
खर्ची सामाजिक शक्ती असते!
तेच डोमकावळे टोच्या मारतात,
ज्यांची उकांड्यावरती भक्ती असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6425
दैनिक पुण्यनगरी
3मार्च 2022
No comments:
Post a Comment