Thursday, March 24, 2022

आर्थिक सल्ला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आर्थिक सल्ला

कोण म्हणतो ईडीच्या धाडींचे,
काहीच परिणाम होणार नाहीत?
इथून पुढे सोयरे-धायरे कधीच,
उसने पैसे मागायला येणार नाहीत.

विनाकारण दिले तरी मरण आहे,
विनातारण दिले तरी मरण आहे.
बायकोचा भाऊ आला तरी,
घाबरायचे काय कारण आहे?

मातोश्री ची शपथ घेवून,
त्यांना पुढचा धोका जाणवू शकता!
बायकोच्या भावालासुद्धा,
वाट्टेल तेव्हा ' मामा ' बनवू शकता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6446
दैनिक पुण्यनगरी
24मार्च 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...