Sunday, March 27, 2022

धाडग्रस्त महाराष्ट्र... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

धाडग्रस्त महाराष्ट्र

टाका धाडी, घाला आत,
जर हाच अजेंडा छुपा असेल.
तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात,
'जेल रिटर्न' चा ताफा असेल.

कुणी ईडीग्रस्त आहे,
कुणी इन्कम टॅक्सग्रस्त आहे!
वर्तमान आणि भविष्य बघून,
सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7883
दैनिक झुंजार नेता
27मार्च 2022
 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...