आजची वात्रटिका
----------------------------
तहनामा
इनकमिंग आणि आउटगोइंग,
हा राजकारणाचाच भाग आहे.
येता-जाता जी सौदेबाजी होते,
त्याचाच खरा जनतेला राग आहे.
तडजोडशिवाय राजकारणच नाही,
म्हणूनच तर त्यांना हा मोह असतो !
आपल्यासाठी असते ती सौदेबाजी,
राजकारण्यांसाठी हा तह असतो!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7877
दैनिक झुंजार नेता
20मार्च 2022
No comments:
Post a Comment